कंटेस्टेंटच्या फ्लाईंग ‘KISS’ मुळं ‘बिग बी’ अमिताभ ‘परेशान’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सीजनमध्ये गुरुवारी अशी एक स्पर्धक येणार आहे जिचा अंदाज पाहून बिग बी देखील परेशान झाले. हरियाणातून आलेली डॉ. उर्मिला धतरवालने जेव्हा हॉट सीटवर बसण्यासाठी आपलं नाव ऐकलं तेव्हा ती उत्साहाने उड्या मारू लागली. तिने आनंदाच्या भरात सर्वांना खूप सारे फ्लाईंग किस दिले. जेव्हा उर्मिला मोठ्या उत्साहात आणि तिच्या स्टाईलने आपल्या सीटवर जाऊन बसली तेव्हा अमिताभ बच्चन तिला पहातच राहिले.

केबीसीच्या गुरुवारी प्रसारीत होणाऱ्या भागात हरियाणातील डॉक्टर उर्मिला धतरवाल फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन हॉट सीटपर्यंत पोहोचणार आहे. उर्मिलाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात उर्मिला आपलं नाव ऐकून आनंदीत होत आहे आणि खूप सारे फ्लाईंग किस देत आहे. अशात बिग बी अमिताभ बच्चन मात्र शांत उभे असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले बिग बी ?
उर्मिला हॉट सीटवर येऊन बसल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, “इतके सारे फ्लाईंग किस तर कोणत्याच कंटेस्टेंटने दिलेले नाहीत.”असेही समजत आहे की, उर्मिला बिग बींना काही हेल्थ टीप्सही देणार आहे. जेव्हा बिग बी तिला विचारतात की, “जास्त मीठ खायचं नाही, जास्त साखर खायची नाही, मग खायचं तरी काय ?” त्यावर उर्मिला म्हणते, “हवा खायची.”

Visit : Policenama.com