15 वर्षांच्या असताना 8 नराधमांनी केला होता बलात्कार, सुनितांची ‘आपबिती’ ऐकून ‘बिग बी’ सुन्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. समाजसेविका सुनीता कृष्णन या आठवड्यात KBC कर्मवीर एपिसोडच्या पाहुण्या म्हणून येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यात त्या सांगताना दिसत आहेत की 15 वर्षांच्या असताना त्यांच्यावर आठ लोकांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

या प्रोमोमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आतापर्यंत 17 वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. मात्र या हल्ल्यांना किंवा मरणाला त्या घाबरत नाहीत. माझा श्वास सुरू असेपर्यंत मी या मुलींसाठी काम करणार आहे असे त्या म्हणत आहेत. ही त्यांची आपबिती ऐकून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन सुन्न झाले. या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

सुनीता यांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे कार्य हाती घेतलेले आहे. केवळ आठ वर्षांच्या असताना त्या दिव्यांग मुलांना डान्स शिकवत असत. त्यानंतर 12 वर्षी त्यांनी झोपडपट्टीमध्ये शाळा सुरू केली होती. त्या 15 वर्षांच्या असताना त्यांनी दलित वर्गातील लोकांसाठी साक्षरता अभियान सुरू केले. पुरुष प्रधान समाजात एका महिलेने केलेला हस्तक्षेप त्यावेळी लोकांना आवडला नसावा त्यामळे त्यांच्यावर आठ जणांनी बलात्कार केला होता. तसेच खूप मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा एक कान डॅमेज झाला आणि त्यांना कमी ऐकू येऊ लागले. मात्र सुनीता यांनी हार मानली नाही आपले समाज सेवेचे काम अखंडपणे सुरुच ठेवले आहे.

सुनीता या एनजीओ प्रज्वलाच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. हे एनजीओ लैंगिक तस्करीची शिकार झालेल्या महिला – मुलींचा बचाव आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करते. त्यांनी आजवर 22 हजारांहून अधिक मुलींची तस्करीतून मुक्तता केली आहे. त्यांच्या या कामासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या