… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू, फॅन्स देखील झाले भावूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रियलिटी टीव्ही शोजला आपल्या देशातील जनतेकडून भरभरून प्रेम मिळते. याचे कारण आहे की, या शोजमध्ये प्रेक्षकांना त्यांचे सेलेब्रिटी आपल्या खर्‍या रूपात पहायला मिळतात आणि दुसरे असे की, तुम्हाला खुप इमोशन्स पहायला मिळतात. ज्याकडे तुमचे यापूर्वी कधी लक्ष गेले नसेल. काहीसा असाच आहे, शो कौन बनेगा करोडपती.

20 वर्षांपासून सुरू असलेल्या या क्वीझ शोचा 12 वा सीझन सुरू होत आहे. या शोमध्ये आपण अनेक वर्षांपासून अनेक लोकांचे इमोशन्स, खुप कष्टदायक क्षण आणि आनंद या व्यापीठावर पाहिला आहे. कंटेस्टन्ट्ससोबत होस्ट अमिताभ बच्चन यांचीही अनेक रूपं या मंचावर पहायला मिळाली. असेही अनेक वेळा झाले, जेव्हा बिग बी एखाद्या गोष्टीनंतर आपल्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबवू शकले नाहीत.

अमिताभ यांना असे इमोशनल झालेले पाहून जनतेचे सुद्धा डोळे पाणावतात. असे कोणते क्षण होते, ज्यावेळी बिग बी यांच्या डोळ्यातून अश्रू आले, ते जाणून घेवूयात…

अमिताभ यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केबीसीमध्ये एक स्पेशल व्हिडिओ दाखवण्यात आला होता, जो पाहून बिग बी खुप भावूक झाले होते. हा व्हिडिओ अमिताभ यांच्या नैनिताल येथील कॉलेज शेरवूडचा होता. व्हिडिओमध्ये लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. व्हिडिओच्या शेवटी अमिताभ यांचे डोळे पाणावले होते आणि डोळयांतून अश्रू वाहू लागले.

जेव्हा ऐकवली वडील हरिवंश राय बच्चन यांची कविता
केबीसीच्या सीझन 11 मध्ये संत रहीम यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामुळे अमिताभ यांना आपल्या वडिलांची आठवण आली. अमिताभ त्यावेळी रडले नाहीत, पण त्यांनी वडीलांनी लिहिलेली कविता ऐकवली होती, यावेळी ते खुपच इमोशनल झाले होते.

आणखी एका बर्थडे विशने केले भावूक
आपल्या वाढदिवसानिमित्त बनवलेला आणखी एक व्हिडिओ पाहिल्यानंतर अमिताभ खुप भावूक झाले होते. त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या बालपणीचे क्षण या व्हिडिओत पाहिले होते आणि डोळ्यातील अश्रू पूसत ते म्हणाले होते, भावूक करतात हे लोक.

जेव्हा एका स्पर्धकाने सांगितली आपली कहानी
केबीसी 11 मध्येच मारिएटा मेदिंस नावाच्या एका स्पर्धकाने आपले बालपण आणि त्याच्याशी संबंधित ट्रॉमाबाबत सांगितले होते. मारिएटा यांनी सांगितले की, कशाप्रकारे बालपणी त्यांचे आई-वडिल त्यांना अनाथाश्रमात सोडून गेले होते आणि तेथून त्यांना आणखी एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. नंतर त्या कुटुंबाने सुद्धा मारिएटा यांना सोडून दिले होते. त्यांची कहानी ऐकून अमिताभ यांच्या डोळ्या अश्रू आले आणि त्यांनी मारिएटा यांना म्हटले होते की, संपूर्ण केबीसीचे कुटुंब आता तुमचे कुटुंब आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या व्यासपीठावरील असे अनेक स्मरणीय क्षण आहेत जे दर्शकांनी पाहिले आहेत, आणि अमिताभ यांनी जगले आहेत. ज्याप्रकारे अमिताभ आपल्या स्पर्धकांना सहजता जाणवून देतात, ते अन्य कुणाला सहज शक्य नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like