गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संबंधित ‘हा’ प्रश्न स्पर्धकाने केला क्विट’; तुम्हाला उत्तर माहीत आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कौन बनेगा करोडपती’च्या 12 व्या सीजनमध्ये महिलांनी वर्चस्व राखले आहे. एकीकडे 2 महिला स्पर्धकांनी 1 कोटी रुपये जिंकले आहेत, तर दुसरीकडे केबीसी 12 लवकरच 1 कोटी जिंकणारी तिसरी महिला स्पर्धक मिळणार आहे. तत्पूर्वी, मध्य प्रदेशातून आलेल्या ओशीन जेहरी यांनी केबीसीच्या सेटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या पूर्ण जोमाने दिसल्या आणि संवेदनशीलतेने खेळल्या. ओशीन यांनी शोमधून 25 लाख रुपयांची बक्षिसे जिंकली. त्यांना 50 लाखांचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी क्विट केले. चला तर मग जाणून घेऊया 50 लाख रुपयांचा प्रश्न काय होता?

प्रश्न- गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार पृथ्वीवरील सर्वांत मोठी सजीव वस्तू कोणती आहे?

पर्याय-

ए- ब्लू व्हेल

बी- जायंट सिकोया

सी- ग्रेट बॅरियर रीफ

डी-हनी मशरुम

बरोबर उत्तर – उत्तर डी

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर डी अर्थात हनी मशरुम होते. पण ओशीन यांना योग्य उत्तर माहीत नव्हते. त्यांना या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजेच पर्याय सी ग्रेट बॅरियर रीफ आहे असे वाटत होते. पण त्यांना पुढे खेळणे योग्य वाटले नाही. त्यांनी 25 लाख रुपये जिंकले आणि अमिताभ बच्चन त्यांच्या खेळण्याच्या उत्कृष्ट पद्धतीमुळे खूप प्रभावित झाले.

ओशीन म्हणाल्या की, कपिल शर्मा शो मला खूप आवडतो. यावर अमिताभ यांनी विचारले की, तू माझा शो पाहत नाहीस का? ओशीन यांनी नंतर सांगितले की, त्या लहानपणापासूनच केबीसी पाहात आहेत. त्यांनी केबीसीच्या सेटचा फोटो त्यांच्या विश बोर्डवर ठेवला होता, त्यात त्या अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभ्या होत्या. ओशीन म्हणाल्या की, त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. खेळादरम्यान, त्या खूप आनंदी दिसत होत्या आणि खूप विचार करून खेळत होत्या.

You might also like