KBC : महिला IPS ऑफिसर बनणार दुसरी करोडपती; 7 कोटी जिंकून रचतील इतिहास ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौन बनेगा करोडपतीमध्ये बुधवारी शोसाठी सीझनमधील पहिली करोडपती स्पर्धक मिळाली आहे. दिल्लीत ग्रुप मॅनेजर म्हणून काम करणार्‍या नाजिया नसीम यांनी खूप विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे देत 1 कोटीचा टप्पा ओलांडला. मात्र, त्यांना 7 कोटींचे उत्तर माहीत नव्हते, अखेर त्यांनी खेळ इथेच सोडण्याचा निर्णय घेतला.

केबीसीला सीझन 12 ची पहिली करोडपती मिळाल्यानंतर आता अवघ्या एक आठवड्यात शोसाठी दुसरी करोडपतीसुद्धा मिळणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये व्हिडिओ रीलिज करण्यात आला आहे, ज्यामध्ये आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा हॉट सीटवर बसून 1 कोटीच्या प्रश्नाला सामोर्‍या जाताना दिसत आहेत.

इतकेच नव्हे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर देत 7 कोटींच्या प्रश्नापर्यंतसुद्धा पोहाेचतात. अमिताभ यांच्याशी बोलताना मोहिता म्हणतात, कितीही रक्कम जिंकून जावो, पण रात्री झोपताना हे वाटेल की चांगली खेळले. मोहिता या सीझनच्या दुसर्‍या अशा स्पर्धक असतील ज्या एक कोटीसाठी योग्य उत्तर देतील.

परंतु मोहिता 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देतील की क्विट करतील? जर मोहिता यांनी 7 कोटींच्या प्रश्नासाठी योग्य उत्तर दिले तर त्यांचे उत्तर योग्य ठरेल की चुकीचे. या प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढील 17 नोव्हेंबरला प्रसारित होणार्‍या एपिसोडमध्ये. हा एपिसोड रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल.