‘KBC’ नं माफी मागावी अन्यथा एकही ‘लाईफलाईन’ शिल्लक राहणार नाही

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन – सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अमिताभ बच्चन यांना देखील ट्रोल केले जात असून आता राजकीय पक्षांनी देखील माफी मागण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आज सोनी वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले असून दुपारी 12 वाजता हि निदर्शने करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यांनी देखील वहिनीला माफी मागण्याची मागणी केली असून जर वाहिनीने या प्रकरणात माफी मागितली नाही तर शो ची एक पण lifeline शिल्लक राहणार नाही अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आता हि वाहिनी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण
गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न आमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला.
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3. महाराजा रणजीत सिंह
4. शिवाजी
दिलेल्या पर्यायांमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com