KCC | खुशखबर ! मोदी सरकार सर्व शेतकर्‍यांना देणार ‘किसान क्रेडिट कार्ड’, ‘इथं’ करा अर्ज आणि घ्या ‘लाभ’, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – KCC | तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमकर यांच्यानुसार, सर्व शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card- KCC) दिले आहे. त्यांनी म्हटले की, महामारीत सुद्धा किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले होते. सरकार मागील वर्षापासून सर्व शेतकर्‍यांना केसीसी अंतर्गत कर्जासाठी अभियान चालवत आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली पाहिजे आणि यामध्ये पैशाची कमतरता भासू नये. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचला पाहिजे.

शेतकर्‍यांना स्वस्तात मिळते कर्ज
आता केसीसी केवळ शेतीपर्यंत मर्यादित नाही. पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी सुद्धा या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. सरकार किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवते. या कर्जावर व्याज 9 टक्के आहे परंतु सरकारकडून यावर 2% सबसिडी मिळते. यामुळे कर्जावर केवळ 7 टक्के व्याज द्यावे लागते.

 

कोण घेऊ शकतात केसीसी

शेतकरी, मत्स्यपालन आणि पशुपालन करणार्‍या सर्व व्यक्ती, इतरांच्या जमीनीत शेती करत असणारे, लाभ घेऊ शकतात. किमान वय 18 आणि कमाल 75 वर्ष असावे. शेतकर्‍याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर एक को-अ‍ॅपलीकंट सुद्धा लागेल. ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. शेतकर्‍याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी पाहिल की, तुम्ही पात्र आहात की नाही.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया
प्रथम ऑफिशियल साइट https://pmkisan.gov.in/ वर जा आणि येथे किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाऊनलोड करा.
फॉर्म तुमच्या जमीनीचे कागदपत्र, पिकाच्या माहितीसह भरावा लागेल.
येथे सांगावे लागेल की इतर बँकेतून तुम्ही कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही.
यानंतर अर्ज भरून सबमिट करा, ज्यानंतर संबंधित बँकेतून तुम्हाला किसान के्रडिट कार्ड मिळेल.

केसीसीसाठी आवश्यक कागदपत्र
आयडी प्रूफसाठी वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
तसचे, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून वोटर ID card / पासपोर्ट/आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स पाहिले जाते.

Web Titel :- KCC | good news modi government will give kisan credit card to all farmers apply here check process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला (व्हिडीओ)

Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून 6 ते 7 जणांकडून वॉचमनला बेदम मारहाण

Whatsapp Multi Device Support Feature | व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘त्या’ फीचरची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या