KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  KCC-Kisan credit card | जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड (KCC-Kisan credit card) द्वारे शेतीसाठी कर्ज (Agri loan) घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. केवळ दोन दिवसानंतर 24 जुलैपर्यंत तुम्हाला बँकेत हे सांगावे लागेल की, तुम्हाला पंतप्रधान पिक विमा योजनेत (PMFBY-Pradhan Mantri Fasal Bima Yojana) सहभागी व्हायचे आहे किंवा नाही.

जर विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल आणि बँकेत लिहून जरी दिले तरी तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. कारण अशा स्थितीत किसान क्रेडिट कार्डच्या पैशातून बँकेद्वारे सरकार विमा प्रीमियम कापून घेईल. जर तुम्हाला विम्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर काही बाब नाही.

बहुतांश राज्यांनी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै ठरवली आहे, यासाठी केसीसी धारक शेतकर्‍यांना 24 जुलैपर्यंत हे काम करावे लागेल. ही योजना आता एैच्छिक आहे.

विना कर्जदार शेतकर्‍यांसाठी आवश्यक कागदपत्र

– शेतीयोग्य जमीनीची कागदपत्र.

– भूमी कब्जा प्रमाणपत्र.

– आधार कार्ड (Aadhaar Card)

– पहिले पान -बँक खात्याच्या माहितीसह बँक पासबुक.

– पिक पेरणी प्रमाणपत्र. राज्याकडून अनिवार्य असेल तर.

– कसण्यासाठी किंवा भाड्याने घेतलेल्या जमीनीवर सुद्धा विमा सुविधा.

– अशा लोकांसाठी जमीन मालकाशी करा, भाडे किंवा पट्टा कागदपत्र.

विम्यात सहभागी होण्यासाठी येथे करा अर्ज

– बँक शाखा, सहकारी समिती

– जनसेवा केंद्र

– पीएमएफबीवाय पोर्टल (www.pmfby.gov.in) वर

– इन्श्युरन्स कंपनी किंवा कृषी कार्यालय.

Web Title : KCC-Kisan credit card | kisan alert do this work in 2 days otherwise bank will deducted money from kisan credit card pmfby agri loan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण

ESIC Covid Benefits | लाखो कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! कोरोनाने मृत्यू झाला तर आई, पत्नी, मुलगा, मुलगी सर्वांना मिळेल पेन्शन; जाणून घ्या