KCR Government | ‘या’ राज्याकडून मोदी सरकारच्या विरुद्ध कृषी कायद्यांबद्दल लढताना प्राण गमावलेल्या 750 शेतकऱ्यांना 3 लाखांची मदत; ‘केसीआर’ यांनी बळीराजाचं ‘मन’ जिंकलं

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR Government) यांनी शेतकरी (farmer) आंदोलनादम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तीन लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री केसीआर (KCR Government) यांनी केली आहे. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक कुटुंबाला ही मदत दिली जाणार आहे.

तसचे सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही त्यांनी केंद्र सरकारला (Central Government) केली आहे. चंद्रशेखर राव (KCR Government) यांचा मुलगा केटीआर यांनी ट्विट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, तेलंगणा सरकारने (Telangana government) कृषी कायद्याविरोधात (agriculture law)
लढताना प्राण गमावलेल्या 750 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत.

यापूर्वी भाजप खासदार वरुण गांधी (BJP MP Varun Gandhi)
यांनी या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले होते.
शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पंजाब सरकारने पीडित शेतकरी कुटुंबासाठी यापूर्वीच अनेक प्रकारची मदत जाहीर केली आहे.
केसीआर यांच्या घोषणेनंतर या मागणीला आणखी जोर मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- KCR Government | kcr government announcing 3 lakh to all the 750 plus farmers who lost lives fighting the farm laws marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता