KCR Pandharpur Visit | ‘मटनाचा शाही बेत! वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका?, केसीआर यांनी पंढरीची वारी अपवित्र करु नये’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – KCR Pandharpur Visit | तेलंगानाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष केसीआर म्हणजे के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrasekhar Rao) हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे (Ashadhi Wari) औचित्य साधून केसीआर हे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरला येत आहेत. त्यांचा दौरा अधिकृतपणे निश्चित झाला आहे. केसीआर पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेत्यांसह सुमारे सहाशे मोटारींचा ताफा पंढरपूरला येत (KCR Pandharpur Visit) आहेत. काहीवेळापूर्वीच ते उमरगा शहरात आले आहेत. तेथून ते सोलापूरच्या दिशेने रवाना होणार असून मंगळवारी सकाळी ते पंढपरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत.

केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावरुन (KCR Pandharpur Visit) राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरीयांनी (NCP MLA Amol Mitkari) टीकास्त्र सोडले आहे. केसीआर हे मटण खाऊन पंढरपूरच्या वारीला जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. मिटकरी यांनी काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे ट्विट सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले की, मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर (CM KCR) हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूरला येताना 10 हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करु नका, असे मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता बीआरएस चे नेते काय प्रतिक्रिया देतात हे बघावे लागेल.

केसीआर यांचे महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन

केसीआर यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. काहीवेळापूर्वीच ते उमरगा येथे दाखल झाले. तेथून केसीआर, तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार असा ताफा सोलापूरच्या दिशेने रवाना होईल. सोलापूरात येताना केसीआर यांच्यासोबत 600 गाड्यांचा ताफा असणार आहे, अशी माहिती आहे. केसीआर सोमवारी सोलापूर येथे मुक्काम करणार असून नेत्यांसाठी शहरातील विविध हॉटेल्समधील 220 रुम बुक केल्या असल्याची माहिती आहे.

Web Title : KCR Pandharpur Visit | ncp leader amol mitkari slams kcr pandharpur visit after eating mutton

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा