धक्कादायक ! माजी महापौरांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे आज ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मागील पंधरा दिवसांपासून कल्याणी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू झाला होता असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कल्याणी पाटील या कल्याण पूर्वमधून 2005 आणि 2010 अशा दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. 2013 ते 2015 अशी दोन वर्ष त्यांना महापौरपदही देण्यात आले होते. 2015 निवडणुकीत त्यांचा फक्त 50 मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचं मोठ सघटनात्मक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली आहे.

माजी महापौरांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नेहमीसारखा येणारा ताप हा कधीही जीवघेणा ठरू शकतो. विशेषत: प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना H1N1 चा लागण लवकर होते. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींना या विषाणूची लागण व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.