निलेश राणेंनी पुरावे असतील तर सादर करावेत ; केदार दिघेंचे आव्हान

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आनंद दिघे यांना संपवल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी निवडणुकीच्या वेळेस संभ्रम निर्माण करू नयेत, असं आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत, असंही केदार दिघे यांनी म्हटले आहे.

दहा वर्षातील साडेचार वर्षे गृहखाते शिवसेनेकडे आहे. मग तपास का नाही केला? आम्ही मर्यादा पाळली, बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. राणेंवर गटरछाप खासदार बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. आनंद दिघेचे काय झाले? कट कसा रचला गेला? त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये कसा दाखवला गेला? ज्या दोन शिवसैनिकांना हे सहन झाले नाही, त्यांना बाळासाहेबांच्या आदेशावरुन कसे संपवले गेले? हे जाहीर करावे लागेल, असे निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलले होते.

दरम्यान, निलेश राणेंच्या या वक्तव्यावरून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंनी अशी आव्हानात्मक प्रतिक्रिया दिली आहे.