सुशांत सिंह राजपूतच्या सिनेमात दाखवण्यात आले होते हिमकडा विनाशाचे सीन्स ! ग्राफिक्सचं झालं होतं खूप ‘कौतुक’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तराखंड येथील चमोली मध्ये 7 फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यानं खूप नुकसान झालं. 2013 साली केदारनाथमध्येही असंच संकट ओढवलं होतं. यावर एक सिनेमाही आला होता. केदारनाथ या सिनेमात सुशांत सिंह राजपूत सोबत सारा अली खाननं डेब्यू केला होता. यात केदारनाथ मध्ये झालेला विनाश आणि एक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती.
कमालीचे होते सिनेमातील ग्राफिक्स
अभिषेक कपूरनं केदारनाथ सिनेमा डायरेक्ट केला होता. केदारनाथ विनाशाच्या ग्राफिक्सचं खूप कौतुक झालं. मेकर्सनं खूप चांगल्या प्रकारे नवीन टूल्सचा वापर केला होता. काही खास सीन असे होते जे पाहून विनाश किती भयानक होता याचा अंदाज येतो.
सिनेमाचं लोकेशन आणि शुटींग
अनेक पर्वतीय भागात याची शुटींग झाली होती. उत्तराखंडमधील अनेक भागात याची शुटींग झाली होती. केदारनाथचं युनिट अनेक दिवस पर्वतांमध्ये होतं. सुशांतनं तर थंडीत गारठत शुटींग केली होती.
सिनेमात सुशांत आणि साराच्या अॅक्टींगचंही खूप कौतुक झालं होतं. साराचा हा पहिला सिनेमा होता. त्यामानानं सारानं खूप चांगलं काम केलं होतं. सुशांतनंही आपल्या अॅक्टींगनं लोकांचं मन जिंकलं होतं. इतकंच नाही तर सिनेमातील गाणीही हिट झाली होती.
सिनेमावरून झाला होता वाद
केदारनाथ सिनेमा अनेक वादात सापडला. सिनेमात तयार झाल्यानंतर आधी पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अडकला.story मेकर्स सोबत वाद झाला. एक वेळी अशी होती जेव्हा सिनेमा बंद होण्याच्या मार्गावर होता. सिनेमात सुशांत मुस्लिम आणि सारा हिंदू दाखवल्यानं दोघांमधील प्रेमाला अनेक संघटनांनी लव जिहादचं नाव दिलं होतं. उत्तराखंडमध्येही सिनेमाला विरोधा झाला होता आणि सिनेमा रिलीज होऊ न देण्याची धमकी दिली होती.