व्यापारी मारहाण प्रकरण ! केडगाव बंद, तणावाची परिस्थिती

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी दुपारी व्यापाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी केडगाव बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी जमावाने मोठमोठ्याने घोषणा देत आरोपींना अटक करण्याची मागणी आहे.

मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव सुनील निंबाळकर असे असून ते आपल्या दुकानाकडे जात असताना केडगाव बाजारपेठेमध्ये दुचाकीवर बसलेल्या काही तरुणांनी त्यांना शिविगाळ करून मारहाण केली होती. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून सोडवल्यानंतर पुन्हा या तरुणांनी सुनील निंबाळकर यांच्या दुकानावर बेकायदा जमाव घेऊन जाऊन तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांची गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली.

आज सोमवारी हा प्रकार व्यापाऱ्यांना समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी केडगाव बंदचे आवाहन केले. पोलीस ठाण्यासमोर आलेला जमावाने अचानक उग्ररुप धारण केला आणि पोलिसांनी घेऊन आलेल्या आरोपींना चोप देण्यास सुरुवात केली. अपुरे पोलीस बळ असताना मोठ्याप्रमाणावर जमाव जमल्याने पोलिसांना तो कंट्रोल करणे अवघड झाले असून केडगावमध्ये व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी व्यापारी मारहाण प्रकरणी 14 तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, केडगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्येच दगडफेक झाल्याचे देखील वृत्त आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like