केडगावची सहकारी संस्था खाजगी जागेत घेऊन जाण्याचा घाट, गावपुढारी म्हणतो माझ्यासाठी काय पण

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेत असणारी एक सहकारी संस्था मुद्दाम खाजगी जागेत घेऊन जाण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याची मोठी चर्चा केडगावच्या चौका-चौकामध्ये होत आहे. सहकारी क्षेत्राच्या जागेत असणारी ही एक मोठी सहकारी संस्था केवळ एका व्यवसायिक गावपुढाऱ्याला खुश करण्यासाठी आणि त्याच्या वाढलेल्या खजिन्यात अजून वाढ करण्यासाठी खाजगी जागेत स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

याचा सुगावा हा त्या नेत्याने भर चौकामध्ये “आम्ही शब्द टाकला तर तो वरिष्ठ नेत्याला पूर्ण करावाच लागतो, आणि आता माझ्या जागेत ती संस्था आणणारच” अशी फुशारकी मारल्याने लागला आहे. स्वयंघोषित गाव पुढाऱ्याच्या या बेताल वक्तव्यामुळे वेळीच अनेक सहकार प्रेमी जागे झाले असून कुठल्याही परिस्थिमध्ये सहकारी जागेत असणाऱ्या संस्था या खाजगी जागेत जाऊन सहकार मोडीत निघू देणार नाही असा प्रण या सहकार प्रेमींनी घेतला आहे.

त्यामुळे गळ्यात सोन्याच्या चैनी आणि बुडाखाली आलिशान गाड्या घेऊन गावभर दोन-चार जण फिरवणाऱ्या स्वयंघोषित गाव पुढाऱ्यासाठी आता वरिष्ठ नेते मंडळी सहकाराशी गद्दारी करून असहकार दाखवणार काय? आणि केवळ आपल्या जवळचा एक गावपुढारी संपत्तीने धनदांडगा आहे. म्हणून हि संस्था त्याच्या मालकीच्या असणाऱ्या खाजगी जागेत नेऊन सहकाराचा गळा आवळणार काय? असे प्रश्न येथील सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना पडले असून या प्रश्नांची उत्तरे जनतेला लवकरात लवकर मिळतील अशी अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

 

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like