केडगाव दुहेरी हत्याकांड : हल्लेखोराला पिस्तूल देणाऱ्याला जामीन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका निवडणुकीच्या वादातून केडगाव झालेल्या दुहेरी हत्याकांडातील हल्लेखोराला पिस्तूल पुरविणारा बाबासाहेब केदार राहणार वडगाव गुप्ता नगर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे प्रत्यक्ष गुन्ह्याच्या कटात सहभाग नसल्याने जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती.

7 मार्च 2018 रोजी केडगाव येथील शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गावठी काट्यातून आतून गोळ्या घालून व गळा चिरून संदीप गुंजाळ याने खून केला होता. संदीप गुंजाळ याने वापरलेला गावठी कट्टा हा बाबासाहेब केदार याच्याकडून खरेदी करण्यात आला होता. त्यामुळे सदर गुन्ह्यात केदार याला अटक करण्यात आली होती. सुमारे सव्वा वर्षापासून केदार हा अटकेत आहे. गुन्ह्याच्या गटात थेट सहभाग नसल्याने केवळ भारतीय हत्यार कायद्यान्वये आरोपी असल्याने जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केदार यांच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने बाबासाहेब केदार याच्या जामिनावर हरकत घेण्यात आली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्यातील काही आरोपींना अजून फरार असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बाबासाहेब केदार याला काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

शिक्षकांसाठी लवकरच ‘कॅशलेस आरोग्य योजना’

माझ्या मानसिक आजाराने खूप काही शिकवलं- दीपिकाने केला खुलासा

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’