केडगाव दंगल प्रकरण : दोन्ही गटांवर गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी नंतर दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिली असून यातील संपत निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १०:३० वा.चे सुमारास कालच्या भांडणामधील आरोपींना तात्काळ अटक करावी हे सांगणेकरीता ते व सुनिल निंबाळकर, हनुमंत निंबाळकर, तुषार निंबाळकर, गणेश सुर्यवंशी, सागर निंबाळकर असे सर्वजण केडगाव पोलीस चौकी येथे येवुन सदर बाबत तोंडी सांगुन तेथुन सर्वजण सकाळी. ११:०० वा.चे सुमारास घराकडे जात असताना केडगाव बाजारपेठेतील रोडवर अरिहंत मेडीकलसमोर एक काळे रंगाची स्विफ्ट गाडी नंबर ७७७४ पुर्ण नंबर माहीत नाही ही दिसली व त्यामध्ये काल भांडणे झाली त्यावेळी तेथे बाजुला हजर असलेला शिवा पिसे हा गाडीमध्ये दिसलेने सुनिल निंबाळकर यांनी शिवा पिसे यांस काल तु भांडणाचेवेळी तेथे का आला होता असे विचारले असता त्या गाडीमधुन परशु गडधे, देवा भंडारी व शिवा पिसे हे खाली उतरले व शिवा पिसे हा म्हणाला की माझा
कालचे भांडणाशी काहीएक संबध नाही असे बोलुन ते सर्वजण मला दम देवु लागले.

त्यावेळी माझे सोबत असलेले सुनिल निंबाळकर, हनुमंत निंबाळकर, तुषार निंबाळकर, गणेश सुर्यवंशी, सागर निंबाळकर असे त्यांना समजुन सांगत असताना तेथे गणेश धायगुडे, सागर वसेकर, बाबा शेंडगे आले व त्यांनी आम्हाला शिवीगाळ देणेस सुरूवात करून त्या सर्वांनी आम्हाला हाताने मारहाण करून तुमचेकडे बघुन घेतो असे म्हणुन तेथुन निघुन गेले त्यानंतर आम्ही केडगाव पोलीस चौकी येथे तक्रार देणेस आलेलो आहे तरी सदर घडले प्रकाराबाबत १) शिवाजी बबन पिसे २) सागर शंकर वसेकर रा.केडगाव ता.दौंड जि.पुणे ३) देवा पप्पु भंडारी ४) गणेश भाउसाहेब धायगुडे ५) परशुराम केरबा गडधे रा.बोरीपार्धी ता.दौंड जि.पुणे ६) बाबा शेंडगे (पूर्ण नाव माहीत नाही) रा.पाटस ता.दौंड जि.पुणे यांचविरूद्ध कायदेशीर फिर्याद दिली तर यातील दुसरे फिर्यादी शिवाजी पिसे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सोमवार दिनांक १८ रोजी ११.०० वा चे समारास मी व माझा मित्र गणेश मेमाणे असे केडगाव स्टेशन बाजारपेठेतील रोडने माझा मित्र दिलीप गडदे याचे काळे रंगाची स्वीष्ट कार नं.एमएच १४/७७७४ ( पुर्ण नबर माहित नाही ) मधुन रोडने अरिहंत मेडीकल समोरून जात असताना अचानकपणे माझे ओळखीचे इसम नामे) सुनिल निबाळकर २) हनमंत सोपान निंबाळकर ) संपत बबन निंबाळकर ४) तुषार रोहीदास निंबाळकर ) गणेश गुलाब सुर्यवंशी ६) सागर महादेव निबाळकर सर्व राकेडगांव ता.दौंड जि पुणे यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन मला काही एक कारण नसताना कारला आडवे उभे राहुन कार थांबवुन आमचे कारचा दरवाजा उघडुन व मला बाहेर ओढत यानेच काल सनिल निंबाळकर यांस मार्केटयार्ड येथे मारहाण केली असे म्हणत हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ दमदाटी करून कारवर दगडाने व हाताने व पायाने जोर जोरात मारून कारचे नुकसान केले आहे.

तेव्हा मी व माझा मित्र असे कारचे समोरील जमाव थोडा बाजुला होताच आम्ही जोरात तेथून स्वताचा जिव वाचविण्याचे भितीने केडगावकडे कारसह पळुन गेलो व त्यानंतर मी पुन्हा माझे अंगातील फाडलेली कपडे घरून बदलून पोलीस चौकीला तक्रार दिली आहे यावरून यवत पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Visit : Policenama.com