माेबाईलमध्ये ठेवावा लागणार ‘एवढा’ बॅलन्स… अन्यथा सिम कार्ड होणार बंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला तुमच्या सिम कार्डच्या नेटवर्कमध्ये तुम्हाला काही अडचण येते आहे का? तुमच्या सिमचे आऊटगोईंग काॅल्स बंद झाले आहेत का ? कदाचित तुम्हाला हा सिम कंपन्यांचा नवीन नियम माहीत नसेल. जर  तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स नसेल ठेवलेला तर तुमचे आऊटगोईंग काॅल्स बंद होतील आणि काही दिवसांनी तुमचे सिम कार्ड बंददेखील होऊ शकते. कारण आता तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे.

जिओ कंपनीने सिमकार्ड कंपन्यांच्या शर्यतीत एंट्री केल्यानंतर अनेक सिन कंपन्यांचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे. अनेकजण इंटरनेटसाठी जिओ चा वापर करत असाताना दिसत आहेत. असे असले तरी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 2 सिमकार्ड असतात. बऱ्याचदा जिओ मुळे ते दुसऱ्या सिमला रिचार्ज करत नाहीत. आणि ते सिम तसेच पडून राहते. आधीच कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने याचाही अधिक प्रभाव पडतो.
गेल्या अनेक दिवसांपासून आयडीया, व्हाेडाफाेन, ऐअरटेल या कंपनीच्या ग्राहकांना किमान 35 रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडीत हाेईल असा मेसेज कंपनीकडून केला जात आहे. अनेकांचे सिमकार्ड बंद देखील करण्यात आले आहे. यामुळे आधीच त्रस्त असलेले ग्राहक सिम बंद हाेत असल्याने अधिक त्रस्त हाेत आहेत.
यामुळे जर तुमच्या सिमला रेंज नसेल तर त्वरीत तुमचा बँलन्स चेक करा आणि त्यात बँलन्स नसेल तर त्याला त्वरीत रिचार्ज करा अन्यथा तुमचे आऊटगोईंग बंद होईल. इतकेच नाही तर हीच परिस्थिती कायम राहिली तर तुमचे सिम कार्ड बंद होण्याचीही शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या सिम कार्डवरील सेवा सुरुच ठेवायच्या असतील तर किमान 35 रुपये बॅलन्स फाेनमध्ये ठेवा.