‘अ’ मृतावस्थेत जाऊ नका, मानसिक स्वास्थ जपा ; सेनेचा अमृता फडणवीस यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमृता शब्दात “अ च महत्त्व असून ते निघाले तर “मृता” राहील. तसेच शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ्य जपा (keep-mental-health), दीपावलीच्या दिवसात “अ” मंगल विचार मनात आणणे “अ” योग्य आहे. ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, असा टोला शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे ( Dr. Neelam Gorhe) यांनी अमृता फडणवीसांना (amrita-fadnavis) लगावला आहे. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणे म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ( Bihar assembly election result ) देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला होता. त्यावरून गोऱ्हे यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, असा सल्ला दिला. तसेच शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हेदेखील विसरू नका, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला आहे. ‘शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद” असे ट्विट केले होते. अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले आहे. यावरून अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला होता.