आग लावण्यासाठी ‘पेट्रोल – डिझेल’ तयार ठेवा, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा कार्यकर्त्यांना भडकावू आदेश (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वातावरण तापले आहे. राजकीय पक्ष त्याचा फायदा घेताना दिसत आहेत. असे असताना आता ओडिशामधील काँग्रेस नेते आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदीप मांझी या व्हिडिओमध्ये फोनवर बोलताना दिसत आहेत आणि कार्यकर्त्यांना आदेश देत आहेत की आग लावण्यासाठी पेट्रोल व डिझेल तयार ठेवा.

काय आहे प्रकरण –
ओडिशात नबरंगपूरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुरुवारी नबरंगपूरमध्ये काँग्रेसने 12 तास बंदची हाक दिली होती. प्रदीप मांझी कार्यकर्त्यांना फोन करुन पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा आणि तुम्हाला सूचना मिळल्यानंतर सर्वत्र आग लावा असे आदेश ते कार्यकर्त्यांना देताना दिसत आहेत. यावेळी स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरा सुरु असताना प्रदीप मांझी यांचे वादग्रस्त विधान कॅमेरात कैद झाले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्रदीप मांझी यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही सर्व आता आणखी गप्प राहू शकत नाही.पहिल्यांदा कुंडलीतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आता नबरंगपूरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यावर सरकार अजूनही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप प्रदीप मांझी यांनी केला. ते म्हणाले की महात्मा गांधींजींच्या तत्वाचे पालन करुन आपण गरिबांना न्याय मिळवून देऊ शकत नसल्याने आता आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा अवलंब करण्यास भाग पाडले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/