केसांना निरोगी ठेवण्यासाठी केसांच्या केअर किटमध्ये ‘या’ गोष्टी समाविष्ट करा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – कडक सूर्यप्रकाश, धूळ आणि माती यांच्यामुळे केस कोरडे व निर्जीव होतात. यामुळे अनेक समस्या उद्भवतात व त्या सोडवणे देखील अवघड होते. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी काही खास गोष्टी समाविष्ट करून ही समस्या टाळता येऊ शकते. जाणून घेऊया त्या अत्यावश्यक गोष्टीं …

१) मालिश करणे आवश्यक आहे
नियमितपणे केसांची मालिश करणे खूप महत्त्वाचे आहे. हे मुळांपासून केसांचे पोषण करते. त्यामुळे केसातील गुंता, कोरडे केस आणि कोंडा या समस्या कमी होण्यास सुरुवात होते. यासाठी केसांना हलक्या हाताने केस धूण्याच्या १ तास आधी मालिश करून ते रात्रभर तसेच राहू द्या. हे केसांचा कोरडेपणा दूर करेल आणि केस सुंदर, दाट, काळे होतील. मलिशसाठी नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईल इत्यादी वापरू शकता.

२) मॉइस्चराइज्ड शाम्पू आणि कंडिशनर
कोरड्या केसांमुळे केस गळण्यास सुरुवात होते. ही समस्या टाळण्यासाठी हायड्रेटिंग शाम्पू आणि कंडिशनर वापरा. हे मुळांपासून केसांचे पोषण करेल आणि ओलावा टिकून ठेवेल त्यामुळे केस गळती कमी होईल.

३) योग्य केसांचा ब्रश
केसांना विचरण्यासाठी नेहमीच रुंद-दात असलेला कंगवा, पैडल ब्रश किंवा डिटैंगलर ब्रश कंगवा वापरा. वापरण्यापूर्वी आपल्या बोटाने केस मोकळे करा. यामुळे लवकरच केस मोकळे होतील.

४) केसांचे सीरम
जास्त धूळ, माती आणि सूर्यप्रकाशामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढतो. जास्त प्रमाणात हेअर स्टाईलिंग मशीन वापरल्याने केसही खराब होतात. केसांना धुतल्यानंतर सीरमचे ३-४ थेंब हलक्या ओल्या केसांवर लावा. हे केसांवर संरक्षणात्मक थर तयार करते. केस सुंदर, दाट, चमकदार होतील.