जेव्हा मुले हँड सॅनिटायझर वापरतात, तेव्हा ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा धोका कायम असून या विषाणूला टाळण्यासाठी लोक आवश्यक खबरदारी घेत आहेत. असे असूनही संक्रमित होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: मुलांना हा विषाणू टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जेव्हा ते कोणत्याही वस्तूला स्पर्श करतात तेव्हा त्यांना हात धुण्यास किंवा स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. मात्र अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्सबद्दल पालकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत की, ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? तुम्ही देखील हात सॅनिटाइज करण्याबद्दल गोंधळत असाल तर जाणून घ्या-

डॉक्टर सॅनिटाइज करण्याचा सल्ला देत आहेत
डॉक्टर मुलांना हात स्वच्छ करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र हात धुण्यासाठी पहिला पर्याय पाणी आणि साबण आहे. जर ते उपलब्ध नसेल (गाडीत, खरेदीच्या वेळी) तर आपण सॅनिटायझरचा वापर करू शकता.

या गोष्टी ठेवा लक्षात
हँड सॅनिटायझरमध्ये ६० टक्के अल्कोहोल असते, जे सॉफ्ट ड्रिंकपेक्षा जास्त असते. हात सॅनिटाइज केल्यानंतर डोळ्यांना स्पर्श करणे हानिकारक असू शकते. त्याचे बरेच दुष्परिणाम असू शकतात. अशात ही खबरदारी नक्की घ्या-

मुलांच्या हातावर सॅनिटायझरचा एक थेंब टाका. आता दोन्ही हाताने ते चांगले मिक्स करा.
सॅनिटायझर नेहमी मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. जर मुलाला सॅनिटायझरमुळे काही समस्या झाली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांना समजावून सांगा की, सॅनिटायझर वापरल्यानंतर आपल्या हातांनी तोंडाला स्पर्श करु नये. नवजात बाळाला सॅनिटायझरपासून दूर ठेवा. तसेच नवजात मुलांवर सॅनिटायझर वापरू नका. पाणी आणि साबण हा एक चांगला पर्याय आहे, हे लक्षात ठेवा. अशात मुलांना सॅनिटायझरचा अधिक वापर करू देऊ नका.