Health Update : केवळ चव नव्हे तर आरोग्य देखील बिघडवतात फ्रीजमध्ये ठेवलेल्या ‘या’ 12 गोष्टी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – घरात फ्रिज नाही, असं घर अपवादात्मक असेल. बहुसंख्य महिला या बाजारातून भाजीपाला, फळं घरी आणल्यानंतर त्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. खाण्याची एखादी वस्तू शिल्ल्क राहिली तर त्या वस्तूही फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. कारण त्या वस्तू खराब होत नाही, पुन्हा त्या खाता येऊ शकतात. पण काही वस्तू अशा असतात की त्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव खराब होते किंवा त्या आरोग्यास हानीकारण ठरू शकतात. पाहुयात अशा कोणत्या वस्तू आहेत त्या फ्रिजमध्ये ठेवू नये.

‘या’ वस्तू फ्रिजमध्ये ठेवू नयेत..

१ )टोमॅटो – खूप दिवस टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटोमधील पाण्याचं प्रमाण कमी होते. थंड तापमानामुळे ते लवकर खराब होतात. त्यांचा रंगही बदलून जातो. असे टोमॅटो भाजी करण्यासाठी वापरल्यास आरोग्याला हानी होऊ शकते.

२) ब्रेड- आपण जर ब्रेडला फ्रिजमध्ये ठेवत असाल तर तुमच्या आरोग्यास असा ब्रेड उपायकारक ठरू शकतो. फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यामुळे तो कडक होतो. त्याची चवही बदलते.

३) बटाटा – थंड तापमानात बटाटा ठेवल्यामुळे बटाट्यातील साखरेचं प्रमाण कमी होते. अशा बटाट्यामुळे पोटाच्या आजार होण्याची शक्यता असते. आपण जर मधुमेहाचं रूग्ण असाल तर चुकूनही बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नका.

३) मध – मध फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे मध हे घट्ट होऊन त्याचे खडे होतात. आपण अशा मधाचं उपयोग करत असाल तर त्यांची चव बदलते. म्हणून मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

४) कलिंगड- उन्हाळ्यात कलिंगड खाणं अनेक जण पसंत करतात. त्याला थंड करण्यासाठी काही जण ते फ्रिजमध्ये ठेवतात. पण कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील जीवनसत्व संपून जातात.

५) कॅाफी- फ्रिजमध्ये कॅाफी ठेवल्यामुळे तिच्यातील फ्रेशपणा नष्ट होतो. फ्रिजमधील अन्य वस्तूंचा कॅाफीच्या सुगंध शोषून घेतात. त्यामुळं अशा प्रकारामुळे अनेक आजाराला निमंत्रण मिळू शकते.

६) केळी – केळींना सामान्य तापमानातच ठेवलं पाहिजे. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यामुळं ती काळी पडतात. ती बेचव लागतात. केळींना नेहमीचं प्लॅस्टिकच्या पिशवीत झाकून ठेवावीत.

७) सोया सॅास- सोसा सॅास, टोमॅटो सूप यासारख्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या खराब होण्याची शक्यता असते.

८) तेल- काही महिला खाद्यतेल फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे हे तेल अधिक घट्ट होऊन जाते. तसेच ते गोठून जाते. त्यासाठी तेल कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये.

९) आंबट फळे – निंबू, संत्री यासारखी सिट्रिक अॅसिड असलेली फळे फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यांना थंड तापमान सहन होत नाही. त्यांच्या सालीवर डाग पडतात. त्यांच्या चवीवरही परिणाम होतो. फ्रिजमध्ये अशी फळं ठेवल्यामुळं त्याच्यातील रस नष्ट होतो.

१०) लोणचं- लोणच्यात विगेनर असल्यामुळं त्याला सामान्य तापमानात ठेवणं गरजेचं असतं. लोणचं फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होतं.