बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणार्‍यास गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 3 जीवंत काडतूसे जप्त केली आहेत.
आकाश अनिल गवळी (वय 24, रा. नर्‍हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. तर, वाढत्या घरफोड्या आणि वाहन चोर्‍या रोखण्यासाठी गस्त घातली जात आहे. दरम्यान, युनिट तीनचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी माहिती मिळाली एकजन बेंगलोर महामार्गावर उभारला असून, त्याच्याजवळ पिस्तूल आहे. त्यानुसार, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून अटक केली.

त्यावेळी त्याच्याजवळ 1 पिस्तूल आणि 3 जीवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहे. त्याने हे पिस्तूल कोठून आणले व त्याचा वापर कोठे केला आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/