केज विधानसभेसाठी वीरशैव लिंगायत महासंघाचा वैभव स्वामींना जाहीर पाठिंबा : वैजनाथ स्वामी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या मतदार संघाचे पाहिले आमदार म्हणून श्रेष्ठ देशसेवक स्व. रामलिंग स्वामी होते. या श्रेष्ठ देशसेवकांचे नातू व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी हे येणारी केज विधानसभा निवडणूक लढवून आजोबांचा आदर्श वारसा पुढे चालवणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या मतदारसंघात वीरशैव समाजाचे मोठे मताधिक्य असून सर्व लिंगायत समाज एकत्र आणण्याची जबाबदारी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ संघटनेने घेत असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देवून उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला आहे.

अखिल भारतीय लिंगायत महासंघ हा महाराष्ट्रात वीरशैव समाजासाठी काम करतो. वीरशैव समाजाच्या सुखदुःखात साथ देण्यासाठी महासंघाचे मोठे योगदान आहे. नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचाराची धुरा अखिल भारतीय वीरशैव महासंघाने स्वीकारत हा मतदारसंघ पिंजून काढला होता. याचा फायदा डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना झाल्याचे निवडणूक निकालाने सिद्ध झाले आहे. सोलापुर लोकसभा निवडणुकीत महास्वामी विजयी होताच त्यांचा भव्य सत्कार महासंघाच्या वतीने मुंबई येथे घेण्यात आला. त्या कार्यक्रमात डॉ.विजय जंगम राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी जाहीरपणे सांगितले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जे वीरशैव लिंगायत समाज बांधव निवडणूक लढवणार आहेत त्यांना बिनशर्त पाठींबा महासंघाच्या वतीने देऊन त्यांना विजयी करण्याचे काम महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामाणिकपणे करतील. या भुमिकेनुसार महासंघाने वैभव स्वामी यांना निवडून आणण्याची जवाबदारी स्वीकारली आहे.

केज मतदार संघात यापूर्वी श्रेष्ठ देशसेवक रामलिंग स्वामी आणि त्यानंतर श्रेष्ठ जनसेवक गंगाधर स्वामी यांना सामान्य जनतेने निवडून देऊन वीरशैव लिंगायत समाजाचे नेतृत्व स्वीकारले होते. या दोन्ही नेतृत्वाने सर्वसमावेशक विकासाचा पाया रचण्याचे काम प्रामाणिक पणे केले. त्यांचे विचार आणि अधुरे राहिलेले कार्य पुढे नेण्यासाठी रामलिंग स्वामी यांचे उच्चशिक्षित नातू वैभव स्वामी जे वकील असून पत्रकारितेत मास्टर ऑफ जर्नलिस्ट आहेत. ते सांजसुयोग दैनिकाचे आणि शिववाणी या शासनमान्य साप्ताहिकाचे १६ वर्षांपासून संपादक आहेत. एका आदर्श शिक्षक मातापित्यांचे चिरंजीव असून सामान्य कुटुंबातील आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते ४ वर्षांपासून बीड जिल्हाध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाच्या या कार्यकाळात त्यांनी सतत विकासात्मक कार्याला लेखणीचे बळ तर दिलेच शिवाय सतत पत्रकारांच्या आणि सामान्य जनतेच्या अडचणींना वाचा फोडून विकासात्मक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपुर्ण बीड जिल्ह्यात ओळख आहे.

अशा वीरशैव समाजातील तरुणास राखीव असलेल्या केज मतदार संघातून आमदार करण्यासाठी सर्व वीरशैव समाजास एकत्र आणण्याची जवाबदारी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेने घेतली आहे. महासंघाचे संघटनात्मक कार्य बघता वैभव स्वामी यांचा विजय निश्चित होवू शकतो असा विश्वास संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या