‘सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही’, CM केजरीवालांचा HM अमित शहा यांच्यावर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी अमित शाह यांना दिल्लीच्या कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यासाठी अमंत्रित केले होते. परंतु, शाहांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. जनतेते जाण्यासाठी अमित शाह तयार नाहीत.

केजरीवाल म्हणाले की, जनतेच्या प्रश्नांची उत्तर यांना द्यायची नाहीत. हे लाजीरवाणे आहे. गीतेत लिहिले आहे की मैदान सोडून कधीही पळू नका. एक खरा हिंदु शूर असतो. मैदान सोडून पळत नाही. अमित शाह यांनी असे मैदान सोडून पळणं योग्य नाही. ते जनतेच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी मैदान सोडून पळ काढत आहेत.

यावेळी केजरीवाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी केवळ शाह यांनाच नाही तर संपूर्ण भाजपला लक्ष्य केले. केजरीवाल म्हणाले की आपण भाजपच्या सर्व नेत्यांकडून हनुमान चालीसा म्हणून घेणार आहोत. दरम्यान केजरीवाल यांनी अमित शाह यांना दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी बोलावले होते, त्याला अमित शाहांकडून प्रतिसाद आला नाही. त्यात भाजप पहिल्यांदा मत मागत असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांनी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करावा असे टोलाही केजरीवाल यांनी भाजपला लगावला.