मोदींनी राफेलमध्ये चोरी केली ; केजरीवालांची मोदींवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी प्रत्येक ठिकाणी सांगत होते, सर्वोच्च न्यायालयाने मला क्लीन चिट दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच हे सिद्ध झाले आहे, मोदींनी राफेलमध्ये चोरी केली आहे. अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. केजरीवाल म्हंटले की, मोदी प्रत्येक ठिकाणी सांगत होते की, सर्वोच्च न्यायालयाने मला क्लीन चिट दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच हे सिद्ध झाले आहे की, मोदींनी राफेलमध्ये चोरी केली आहे. मोदींनी देशाच्या सेनेची फसवणूक केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल केली होती.

विशेष म्हणजे, आज सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर राफेल डील प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. दरम्यान, राफेल डील प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविली आहे. तसेच, केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. तर कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रे वैध असल्याचे म्हटले आहे.