मद्यावरील विशेष कोरोना कर : केजरीवाल सरकारने कमावले केवळ 15 दिवसात ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व व्यवहार बंद असताना उत्पन्नासाठी सर्वच राज्यांनी दारुचा आधार घेतला. दिल्ली सरकारने मद्यावर तब्बल ७० टक्के विशेष कोरोना कर लावला. दिल्लीत सर्वात महाग दारु विकली जात असली तरी मद्यशौकिनांना त्यांची फिकिर नसल्याचे दिसून आले. विशेष कोरोना कर लावल्यानंतर गेल्या १५ दिवसात दिल्ली सरकारला मद्यविक्रीतून तब्बल ११० कोटी रुपयांचा महसुल मिळविला आहे.

दिल्ली सरकारला १२ मेपर्यंत मद्यावरील करातून ५५ कोटींचा महसुल मिळाला होता. १५ मे रोजी हे उत्पन्न ७० कोटी तर २१ मेपर्यंत ११० कोटींवर पोहोचले आहे. शनिवारी दिल्ली सरकारने आणखी ६० वाईन शॉप परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दिल्ली सरकारच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे.

दिल्लीमध्ये एकूण ८५० मद्यविक्रीची दुकाने आहेत.त्यातील १५० दुकाने मोठे मॉल आणि विमानतळाजवळ आहे. त्यांना सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सरकारने ५ मेपासून मद्याच्या छापिल किंमतीवर ७० टक्के इतका विशेष कोरोना कर लावला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like