दुबईला जाऊन केजरीवाल काळा पैसा पांढरा करतात : भाजप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अडचणीत सापडलेल्या भाजपने आता विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरूवात केली आहे. नॉनकरप्ट अशी प्रतिमा असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता भाजपने काळा असल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल हे दुबई दौऱ्यावर गेल्याने भाजपने भाजपने हा आरोप केला आहे. केजरीवाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी गुप्तपणे दुबईला गेले असल्याचे भाजपने म्हटले आहे. दिल्लीतील हवा विषारी बनत असताना लोकांची काळजी घेण्याऐवजी ते परदेश दौऱ्यावर जातात, अशी टीकाही भाजपने केली आहे.

दरम्यान, केजरीवालांवरील आरोप निराधार असून ते त्यांच्या आयआयटीमधील मित्राच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले असल्याचे स्पष्टीकरण आपचे नेते राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. भाजपचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी ट्विटरवरुन केजरीवालांच्या दुबई दौऱ्यावरून प्रश्न विचारला आहे. पक्षाच्या राजकीय मदतनिधीच्या नावाने ते काळा पैसा पांढरा करत आहेत. दिल्लीकरांचा पैसा ते इतर राज्यात आपचा प्रभाव वाढवण्यासाठी वापरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. नुकतेच दिल्लीचे आरोग्यमंत्री कोणालाही थांगपत्ता न लागू देता आठवडाभरासाठी दुबईला जाऊन आले.

हा सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचेही ते म्हणाले. भाजप आमदार व दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विरेंद्र गुप्ता यांनीही तिवारींच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. ८ नोव्हेंबरला केजरीवाल एअर इंडियाच्या विमानाने दुबईला जातात व आप ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करते. या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आपचे नेते राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.