दिल्ली लोकसभेसाठी केजरीवाल – राहुल गांधी एकत्र …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी दिल्लीत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल एकत्र येण्याचे संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस आणि आप युती करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दिल्लीत लोकसभेच्या एकुन सात जागा असून कॉंग्रेस आणि आप प्रत्येकी तीन जागा लढणार असल्याची चिन्हं आहेत. सातव्या जागेवर शत्रुघ्न सिन्हा हे उमेदवारी लढवण्याचे संकेत आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत कॉंग्रेस व आपचा पुर्णपणे दारुन पराभव झाला होता. तर भाजपाने सातही जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडीत आपचा समावेश होणार का ? ,
याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना दिल्लीत आप आणि कॉंग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसापुर्वी म्हंटले होते की ,मी कॉंग्रेसच्या मागे लागुन थकलो , पण आघाडीसाठी  त्यांच्याकडुन कोणताच संपर्क होत नसल्याच म्हंटले होते. मुंबईत झालेल्या शुक्रवारच्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलतांना म्हंटले की, हे महागठबंधन असून आमच्या बरोबर ज्यांची येण्याची इच्छा असेल , त्या सर्वांसाठी कॉंग्रेसची दारे खुले आहेत. अस त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणा करण्याची बाकी आहे.