केजरीवालांच्या यशामध्ये पत्नी सुनिता यांचा मोलाचा ‘वाटा’, मुख्यमंत्र्यांनी दिलं बर्थडे ‘गिफ्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेचे सर्व 70 जागांचे निकाल समोर येत आहेत. त्यात आपचा मोठा विजय झाला. त्यामुळे आजचा दिवस केजरीवालसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याबरोबरच केजरीवाल यांच्या पत्नी केजरीवाल यांच्या पत्नीचे सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस आहे. केजरीवाल आज त्यांच्या पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट देत आहेत.

पत्नी सुनीता यांनी यंदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जोरदार प्रचार केला होता. एवढेच नाही तर केजरीवाल यांची दोन्ही मुलं प्रचारात उतरली होती. केजरीवाल यांची प्रतिमा समाजात बरीच काही वेगवेगळी आहे परंतु ते त्यांच्या पत्नीच्या नजरेत त्यांचे हिरो आहेत. सुनिता आणि अरविंद केजरीवाल यांची प्रेमकथा देखील बरीच चर्चीली गेली आहे. त्यांना आपले प्रेम व्यक्त करण्यास अनेक महिने लागले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सुनिता यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे.

प्रपोज करण्यासाठी लागवला महिना –
सुनिता यांचे स्वप्न होते की, त्यांचे पती प्रमाणिक आणि देशाची सेवा करण्यात प्राथमिकता देणारे असावेत. इंडियन रेव्हेन्यू सर्विसची परिक्षा पास झाल्यानंतर केजरीवाल आणि सुनीता नागपूर स्थित नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली त्यांची मैत्री वाढली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले परंतु दोघांनी एकमेकांना प्रपोज केले नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी केजरीवाल यांना 4 महिने लागले. यानंतर त्यांनी एकमेकांसोबत जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यापर्यंतच्या यशामध्ये सुनीता यांचे मोठे योगदान –
केजरीवाल अनेकदा म्हणले आहेत की त्यांचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचे प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या यशामागे पत्नी सुनिता यांचे मोठे योगदान आहे. मग ते अण्णा हजारे यांच्यासोबतचे उपोषण असेल किंवा नेत्यांद्वारे केले गेलेले आरोप यात केजरीवाल यांना सुनिता यांचा मोठा वाटा आहे.