दिल्लीचे CM केजरीवालांकडून महिलांना भाऊबीजेची ‘ओवाळणी’, सर्व बसमधून ‘मोफत’ प्रवास

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भाऊबीजेच्या पूर्व संध्येला केजरीवाल सरकारने एक अध्यादेश जारी केला असून सर्व प्रकारच्या बसमधून महिला आता मोफत प्रवास करु शकणार आहे.

सोमवारी रात्री उशिरा अध्यादेश जारी केला. केजरीवाल सरकारमधील परिवहन व विधी मंत्री कैलाश गहलोत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, केजरीवाल सरकारने महिलांना बसमधून मोफ प्रवास करण्याचा वादा केला होता. तो आज पूर्ण केला आहे. मंगळवारपासून महिला सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करु शकणार आहे. एखाद्या महिलेला तिकीट घेऊन प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ती स्वतंत्र आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व बसमधून महिलांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. नव्या वर्षात नवी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केजरीवाल सरकारने शिक्षण, वीज, पाणी या मुलभूत गोष्टीवर अनेक कामे केली आहे. आता त्यांनी महिलांना मोफत प्रवास करुन आपण दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. याद्वारे केजरीवाल यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे.

Visit : Policenama.com