खळबळजनक ! आइसक्रिममध्ये विष टाकून भावानेच घेतला बहिणीचा जीव

पोलिसनामा ऑनलाईन – भावानेच 16 वर्षीय बहिणीच्या आइसक्रिममध्ये विष टाकून खून केल्याची धक्कादायक घटना केरळमधील कासारगोडा जिल्ह्यात घडली आहे.याप्रकरणी 22 वर्षीय अलबीनला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलबीनने आइसक्रिममध्ये विष केवळ बहिणीला मारण्यासाठी टाकले होते. मात्र 16 वर्षीय मृत अ‍ॅनासोबतच तिच्या वडीलांनीही हे विष असलेले आइसक्रिम खाल्ले. त्यामुळे काही वेळाने दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अ‍ॅनाच्या शरीरात जास्त विष गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. केवळ अ‍ॅनाला मारण्याचा त्याचा डाव होता. केवळ अ‍ॅना आणि बेन्नी यांनी आइसक्रिम खाल्ले. तर, अलबीन आणि त्याच्या आईने खाल्ले नाही. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांना आइसक्रिममध्ये उंदिरांना मारण्याचे औषध आढळले. अलबीनने याआधी जेवणात विष टाकून घरच्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने आइसक्रिममध्ये विष टाकले. अलबीनने फ्रिजमध्ये दोन भांड्यात आइसक्रिम ठेवले होते, त्यातील एकात त्याने विष टाकले होते. ते आइसक्रिम त्याने अ‍ॅनाला खाऊ घातले. तर, अलबीनने विष नसलेले आइसक्रिम खाल्ले. अ‍ॅनाच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्येही तिच्या शरीरात विष असल्याचे आढळून आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like