खळबळजनक ! 3 परीक्षार्थी अन् तीन पालक निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, तब्बल 600 पालकांविरूध्द FIR दाखल

केरळ : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना काही विद्यापीठांनी मुलांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. मेडिकल, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहेत. केरळमध्ये इंजिरिअरिंग आर्किटेक्चर मेडिकलने परीक्षेचे आयोजन केले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडण्यात आले. याचा परिणाम परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक असे एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. याप्रकरणी तब्बल 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी झालेल्या परीक्षेत दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर आणखी एक विद्यार्थी आणि उपस्थित पालकाला कोरोना झाल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणानंतर आता सरकारने KEAM वर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी केलेल्या गर्दीचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोवरून परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या 600 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केरळमधील इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकलने या परीक्षेचे 16 जुलै रोजी आयोजन केले होते. दरम्यान परीक्षा केंद्राबाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आल्याचे दिसून आले. व्हायरल फोटोवरून पालकांविरुद्ध 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पोलीस पालकांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने परीक्षा घेण्यास परवानगी दिलीच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.