वायनाडमध्ये ‘त्यानं’ राहुल गांधींचं घेतलं ‘चुंबन’, प्रतिक्रया देखील दिली नाही (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या चार दिवसांच्या केरळ दौर्‍यावर आहेत. बुधवारी वायनाड या त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक उघडकीस आली आहे.

राहुल गांधी आपल्या मतदान क्षेत्राचा दौरा करत असताना एक व्यक्ती सुरक्षा रक्षकांचा फेरा चुकवून थेट राहुल गांधींच्या गाडी जवळ गेला त्याने राहुल यांच्याशी हात मिळवला आणि लगेच त्यांना ओढत त्यांचे चुंबन घेतले. इतक्यात रक्षकांनी त्या व्यक्तीला बाजूला ओढले. राहुल गांधीही या प्रकारामुळे थोडे स्तब्ध अवस्थेत गेले मात्र गाडीत असल्यामुळे त्यांना काही प्रतिक्रिया देता आली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –