केरळ विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित, एप्रिल-मेमध्ये होणार विधानसभा निवडणूक

तिरुअनंतपुरम : केरळची 14वी विधानसभा शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. विधानसभेने मागील साडेचार वर्षात 109 विधेयक मंजूर केली. राज्यात पुढील विधानसभा निवडणूक याच वर्षी एप्रिल-मेमध्ये होणार आहे.

मुख्यमंत्री पी. विजयन यांचे 2016 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर 22 सत्रांमध्ये एकुण 232 दिवस कामकाज झाले. या दरम्यान बहुप्रतिक्षित मल्याळम भाषा विधेयकापासून ख्रिश्चनांच्या अंत्यसंस्कारांशी संबंधीत महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आली.

विधानसभा स्पीकर पी. श्रीरामकृष्णन यांनी सांगितले की, 14वी विधानसभा खुप फलदायक आणि रचनात्मक होती. मंजूर केलेल्या 109 विधेयकांपैकी 87 सरकारी आणि 22 अर्थ व विनियोग विधेयक होती. या विधेयकांद्वारे राज्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारे प्रभावित करणारे अनेक मुद्दे विचारासाठी आले. सभागृह पेपरलेस बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला टप्पा या विधानसभेच्या 18व्या सत्रात सुरू झाला होता.

अनेक विधेयक राज्यपालांनी परत पाठवली
सध्याच्या विधानसभेच्या काही प्रमुख घटनाक्रमांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 25 मे, 2017 ला सभागृहाने केरळ मेरीटाइम बोर्ड बिल, 2014 रद्द करण्याचा सुद्धा एक संकल्प मंजूर केला होता, परंतु राज्यपालांनी तो परत पाठवला. अशा प्रकारे 2018 मध्ये मंजूर केरळ व्यावसायिक कॉलेज (मेडिकल कालेजमध्ये दाखल्याचे नियंत्रण) विधेयक सुद्धा राज्यपालांनी परत पाठवले.

14 व्या विधानसभेत माजी राज्यपाल पी. सतशिवम यांनी चारवेळा आणि सध्याचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांनी दोनवेळा अभिभाषण दिले.