केरळ सरकारनं अर्थसंकल्पाच्या ‘कव्हर’ पानावर छापली गांधींच्या हत्येची फोटो, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ सरकारद्वारे आर्थिक वर्ष २०२० – २१ साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर गदारोळ माजला आहे कारण या अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा फोटो लावण्यात आला आहे. या याबाबत सीपीएम चे नेता एमबी राजेश यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, ‘जेव्हा गांधीजींच्या हत्येचा आनंद व्यक्त केला जातो तेव्हा असे करणे हे फार महत्वाचे ठरते.’ तसेच ते म्हणाले की, ‘आम्हाला पुन्हा एकदा देशातील लोकांना हे पटवून द्यायचे आहे की महात्मा गांधींनी आपल्यासाठी किती मोठा त्याग दिला आहे.’

सरकारच्या या निर्णयावर बीजेपी नेता टॉम वड्डक्कन म्हणाले की, ‘ते कोणते लोक आहेत जे महात्मा गांधींच्या हत्येचा आनंद व्यक्त करत आहेत. कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हे निश्चित केले आहे. गांधीजींच्या हत्या झाली त्या काळातील फोटो छापून तुम्ही या सरकारमध्ये लोक कसे मारले जात आहेत याची आठवण करून देत आहात. मुखपृष्ठावर महात्मा गांधींच्या हत्येचे छायाचित्र प्रकाशित करून हे लोक आपल्या सरकारमधील अपयश आणि चुकीच्या कामांना लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’

तसेच ते म्हणाले की ‘केरळ सरकार लोकांचे लक्ष हे मूळ मुद्द्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हत्यांबाबत यांच्याकडे काहीच उत्तर नाही त्यामुळे अशा काही घटना समोर आणून लोकांचे ध्यान हटविण्यासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. यांना केरळच्या जनतेला उत्तर द्यावे लागेल.’

‘बीजेपीला आपला इतिहास माहित आहे’
उत्तर देताना एमबी राजेश म्हणाले की आत्ताच काँग्रेस मधून बीजेपीमध्ये आलेले वड्डक्कन यांना हे समजले पाहिजे की केरळ सरकारला काहीच लपवायचे नाही, उलट आमचा विकास दर देशामधील इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. यांचेच सरकार विविध गोष्टी ह्या जनतेपासून लपवत असते. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही नाममात्र जीडीपीचा उल्लेख केला आहे.

अर्थससंकल्पाच्या मुखपृष्ठावरील गांधीजींच्या हत्येबाबतचा फोटो आणि त्याचा अर्थसंकल्पाच्या संबंधावर एमबी राजेश यांनी म्हटले की बीजेपीला आपला इतिहास माहित आहे त्यामुळे त्यांना याचे वाईट वाटत आहे.