केरळचे व्यावसायिक ‘मॅरेडोना’च्या स्मरणार्थ बनवतील ‘संग्रहालय’, उभारणार सोन्याची मोठी प्रतिमा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अर्जेंटीनाला फुटबॉलच्या जगतातील विश्‍वविजेते बनविणारे महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) ने गेल्या महिन्यात जगाला निरोप दिला होता. ते 60 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने मॅराडोना यांचे निधन झाले होते. मॅराडोनाला घरीच हृदयविकाराचा झटका आला. मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वीच त्यांच्या मेंदूत क्लॉटिंग देखील झाले होते, त्यानंतर त्यांची सर्जरी करावी लागली.

आता या दिग्गज फुटबॉलपटूच्या स्मरणार्थ केरळमधील एक व्यावसायिक म्युझिअम बनवणार आहे. केरळच्या या व्यावसायिकाने सोमवारी सांगितले की डिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ एक जागतिक दर्जाचे संग्रहालय तयार केले जाईल, ज्यात अर्जेटिनामधील दिग्गज फुटबॉलपटूची सोन्यापासून बनविलेली प्रतिमा मुख्य आकर्षण असेल.

द हॅंड ऑफ गॉडचे प्रतिनिधित्व करेल ही प्रतिमा

बॉबी चेम्मानूर इंटरनॅशनल ग्रुपचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर बॉबी चेम्मानूर म्हणाले की, मॅराडोनाची ही प्रतिमा ‘द हॅंड ऑफ गॉड’चे प्रतिनिधित्व करेल. या महान अर्जेंटीनाच्या खेळाडूने 1986 च्या फिफा वर्ल्ड कपमधील त्याच्या एका महत्त्वाच्या गोल ला हेच एक नाव दिले होते. त्याच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने हा विश्वचषक जिंकला होता. चेम्मानूर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की प्रस्तावित संग्रहालय कोलकाता किंवा दक्षिण भारतात बांधले जाईल. यामध्ये मॅराडोनाच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची झलक पाहायला मिळेल.

अर्जेंटिनाला बनविले होते विश्व विजेता

मॅराडोना एकीकडे मैदानावर एक उत्कृष्ट फुटबॉलपटू राहिले, तर दुसरीकडे मैदानाबाहेर ते अनेक वादांमुळे बदनाम देखील झाले. मॅराडोनाला मद्यपान आणि अंमली पदार्थांचे व्यसन जडले होते. मॅराडोनाने 1986 मध्ये अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. त्यांच्या एका वादग्रस्त गोलने इंग्लंडला विजयापासून दूर सारले होते. गोल मॅराडोनाच्या हाताला लागून झाला होता परंतु रेफरीला ते दिसू शकले नाही आणि त्याचा परिणाम अर्जेंटिना वर्ल्ड चॅम्पियन झाला. मॅराडोनाचा हा गोल फुटबॉलच्या इतिहासात ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून प्रसिद्ध आहे.