दक्षिणेतील ‘या’ खासदाराने हिंदीतून ‘शपथ’ घेतल्याने सभागृह ‘अवाक’, संसदेतील सदस्यांनी ‘बाक’ वाजवून केलं स्वागत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील काँग्रेसचे खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी आज सोमवारी हिंदीमध्ये शपथ घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी १७ व्या लोकसभेतील सदस्यत्वाची शपथ हिंदी भाषेत घेतली. केरळच्या खासदाराने अशाप्रकारे हिंदी भाषेत शपथ घेतल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांच्या या कृतीचे जोरदार स्वागत केले.

दक्षिणेकडील राज्याकडून कायम हिंदी भाषेला विरोध होत आला आहे. तसेच दक्षिणेकडील राज्ये हे मातृभाषेच्या प्रखर अस्मितेसाठी ओळखले जातात. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ राज्यामधील एका खासदाराने हिंदीमध्ये शपथ घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सदस्यत्वाची शपथ घेणारे सुरेश हे दुसरे सदस्य होते. हंगामी सभापती वीरेंद्र सिंह यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

कोण आहेत सुरेश

कोडिकुन्निल सुरेश सहाव्यांदा खासदार झाले आहेत. तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कोडिकुन्निल परिसरात एका गरीब कुटुंबात जन्मलेले सुरेश १९८९ ला पहिल्यांदा खासदार झाले. १७ व्या लोकसभेत ते मावेलीकारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सुरेश यांनी श्रम मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळलेली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांची केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले होते. याबाबरोबरच ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य देखील राहिले आहेत.

नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ

१७ व्या लोकसभेतील सर्व नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. नरेंद्र मोदी शपथ घेत होते तेव्हा सर्व भाजपच्या खासदारांनी ‘मोदी मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.

सिनेजगत  

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’ 

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’