67 वर्षाचा ‘वर’ तर ‘वधू’ 65 ची, ट्विटरवर ‘ट्रेन्ड’ करतंय ‘नवदाम्पत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे म्हणतात की प्रेमाला वय नसते. प्रेम कधीही आणि कोणत्याही वर्षी होते. प्रेम करण्यासाठी वय नाही तर एकमेकांसाठीची भावना महत्वाची असते. असेच काहीचे घडले आहे. केरळमधील एका सरकारी वृद्ध आश्रमात एका वृद्ध जोडप्याने लग्न केले आहे. ट्विटर युजर्सने रविवारी ट्विट करुन त्यांच्यासाठी अभिनंदनाचे संदेश पाठविले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी कोचीनियन मेनन आणि लक्ष्मी अम्मल यांची भेट त्रिशूर जिल्ह्यातील रामवर्मपुरम येथील वृद्धाश्रम आश्रमात झाली आणि प्रेमात पडले.

शनिवारी मेनन वर्ष (67) आणि लक्ष्मी वर्ष (65) यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जोडप्यांना सगळ्या युजर्सकडून शुभच्छा येत आहे. अनेक युजर्सने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. एका युजरने लिहिले की, ‘तुमचे प्रेम असेच कायम राहु द्या’ लक्ष्मी यांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती आणि त्यांनी चमेलीच्या फुलांचा गजरा लावला होता. मेनन यांनी ऑफ-व्हाईट पारंपारिक मुंडू आणि शर्ट घातला होता.

एका युजरने लिहिले की, ‘केरळमधील वृद्ध आश्रमामध्ये झालेले हे पहिले लग्न आहे. कोचानियन वेड्स लक्ष्मी यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.’ दुसर्‍याने लिहिले की, ‘प्रेमाला कोणतीच सीमा नसते ते कधी होईल सांगता येत नाही.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/