Coronavirus : मंगलोरच्या डॉक्टरांचा दावा, झिंक आणि गरम पाण्याने 7 कोरोना रुग्णांना केले बरे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशातील कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोना लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या सगळ्यात मंगलोरच्या एका डॉक्टरने दावा केला आहे की, झिंक आणि गरम पाणी वापरुन कोरोना टाळता येऊ शकतो. डॉक्टरांच्या मते जर शरीरात झिंकचे प्रमाण योग्य असेल तर संक्रमण किंवा विषाणू शरीरावर परिणाम करू शकत नाही. डॉक्टरांचा दावा आहे की, त्यांनी आतापर्यंत झिंक आणि गरम पाण्याने ७ कोरोना रूग्णांवर उपचार केले आहेत आणि ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

एका वृत्तानुसार, मंगलोरच्या ए.जे. मेडिकल कॉलेजमध्ये हेड अँड नेक सर्जरीचे प्राध्यापक डॉ. पीपी देवन यांच्या म्हणण्यानुसार किंवा देशातल्या प्रत्येकाने त्यांच्या आहारात झिंकचा समावेश केल्यास कोरोना किंवा अशा प्रकारचे संक्रमण टाळता येऊ शकते. डॉ. देवन म्हणाले की, कोरोना एक सामान्य विषाणूसारखाच आहे केवळ त्याची शक्ती इतर विषाणूंपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले की, जर खरबूज आणि पपईचे दाणे, अननस आणि अक्रोड यांचा आहारात समावेश केल्यास कोरोना टाळता येईल. तसेच शरीरात झिंकचे प्रमाण वाढवणार्‍या औषधांमुळेदेखील कोरोना टाळता येईल, असे ते म्हणाले.

डॉ. देवन म्हणाले की, जर तुमचा घसा खवखवत असेल किंवा तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही ताबडतोब गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. इतके गरम पाणी कि ते पिण्यामुळे तुम्हाला घाम येईल आणि शरीराचे तापमान एक ते दोन अंश वाढेल. डॉ. देवन म्हणाले की, तसे तर घाम पळण्यामुळे आणि काम केल्यानेही येतो, परंतु गरम पाण्यामुळे व्हायरस वाढण्यास थांबेल. तसेच जर शरीरात झिंकचे प्रमाण योग्य असेल तर रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि व्हायरस मरून जाईल.

डॉ. देवन म्हणाले की, पपई आणि टरबूजची पावडर बनवून ती भातासह खाल्ल्यानेही खूप फायदा होतो. दोन अक्रोड, थोड डार्क चॉकलेट, अननसाचे सेवन केल्यानेही शरीरात झिंकचे प्रमाण वाढते. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक व आयरनच्या गोळ्याही घेता येतात. डॉ. देवन म्हणाले की दररोज सुमारे ४० मिलीग्राम झिंक आवश्यक असते. दक्षिण भारतात सूप पितात, त्यात भरपूर झिंक असते. लंच किंवा डिनरमध्ये फळांचे सेवन केल्यानेही शरीरात झिंकचे प्रमाण वाढते.

या चार सवयीने मजबूत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती

–  रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चहा पिणे बंद करावे लागेल. जर कोणाला चहा पिण्याची सवय असेल तर त्याने पाणी किंवा दूध गरम करावे आणि त्यामध्ये चहाची पाने घालावी आणि फिल्टर करुन पटकन प्यावे. चहा जास्त उकळवल्याने त्यातील केमिकल बाहेर येतात आणि ते शरीरात आयरन झिंक रोखतात.

–  आहारात लिंबू वापरण्याची सवय लावायला हवी. एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू टाकून पिल्यास फायदा होईल.

–  झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद टाकून प्या. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

  आहारात झिंकचे प्रमाण वाढवा आणि गरम पाणी पिण्याची सवय लावा. खाल्ल्यानंतर गरम पाण्यात जिरे टाकून पिणे देखील फायदेशीर आहे.