त्यांनी चक्क बिबट्याला मारुन त्याचे ‘मांस’ खाल्ले; बिबट्याची कातडी, नखे, दात हस्तगत, वन विभागाची कारवाई

तिरुअनंतपुरम : वाघ, सिंह व इतर वन्य प्राण्यांची कातडी, नखे आदी भागाची तस्करी करण्यासाठी त्यांना मारले जाते. मात्र, केरळमध्ये (Kerala) काही जणांनी चक्क बिबट्याला मारुन त्याचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वन विभागाने इडुक्की जिल्ह्यातील माणकुलम येथील ५ जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांकडून जनावरांची कातडी, दात आणि नखे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती माणकुलम वन अधिकारी व्ही़ बी़ उदयसोर्यन यांनी दिली. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगितले जाते.

 

 

 

 

 

शेतात भटकणार्‍या एका ७ वर्षाचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या या लोकांच्या गुरांना त्रास देत होता. त्याने त्यांच्यावर हल्ले केले होते. त्यामुळे त्यांनी सापळा लावून या बिबट्याला पकडले. त्यांची कातडी सोलून मांस शिजवून खाल्ल. ही माहिती मिळाल्यावर वन विभागाने त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना भांड्यांमध्ये शिजविलेले बिबट्याचे मांस तसेच अर्धवट खावून शिल्लक राहिलेले काही मांसाचे तुकडे, बिबट्याचे कातडे, दात व नखे मिळून आले. वन विभागाने वन्य जीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमाखाली त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.