एकाच गाडीतील भाजपा, काँग्रेस, कम्युनिस्ट समर्थकांचा ‘हा’ फोटो सोशलवर व्हायरल

केरळ : वृत्तसंस्था – सध्या लोकसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राजकीय नेते अगदी पातळी सोडून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. अनेकदा काही जण आपल्या समर्थकाची बाजू घेत असल्याकारणाने त्यांच्या मैत्रीमध्ये दरी निर्माण होताना दिसत आहे. अशातच आता मैत्रीचा संदेश देण्यासाठी एका मित्रांच्या ग्रुपचा फोटो व्हायरल होत आहे. मैत्रिला धरून खास संदेशही यातून देण्यात आला आहे. या फोटोमध्ये एकाच गाडीमध्ये दक्षिणेत एकमेकांविरोध लढणाऱ्या संयुक्त लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी आणि भाजपा या तिन्ही विचारसणीला पाठिंबा देणारे मित्र एकाच गाडीतून प्रवास करताना दिसत आहे.

सध्या सोशल नेटवर्किंगवर राजकारणासाठी मैत्री गमावू नका असा संदेश देणारा एका मित्रांच्या ग्रुपचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये एकाच गाडीमध्ये मित्रांचा संपूर्ण ग्रुप बसलेला दिसत आहे. त्यांच्या हातात काँग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे असून ते हसताना दिसत आहेत. मैत्रीचा संदेश देणारा हा फोटो ‘व्हॉइस ऑफ साऊथ इंडिया’ या फेसबुक पेजने शेअर केला आहे. फोटोखालील कॅप्शनमध्ये, ‘हे फक्त केरळमध्येच होऊ शकते. वेगळ्या राजकीय विचारसरणीमुळे तुमचे मित्र गमावू नका,’ असं म्हटलं आहे.

सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटिझन्सनी इन्क्रेडीबल इंडिया, दुर्मिळ, केरळ रॉक्स, सुंदर, शिकण्यासारखं बरचं काही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/ash7k/status/1120793563363778560