कोरोना व्हायरसची दहशत देशभरात ! केरळमध्ये Corona Virus राज्यावरील ‘आपत्ती’ म्हणून ‘घोषित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळत असल्याने राज्य सरकारने कोरोना व्हायरसला राज्यातील आपत्ती घोषित केली आहे. यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात असून हा आजार प्रभावीपणे रोखण्याचे आदेश केरळ राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

केरळ राज्याचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या निर्देशानंतर ही आपत्तीची घोषणा केली आहे. अलपुझा येथे कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेण्यास राज्यापातळीवर सुरुवात झाली आहे. तसेच चीनच्या वुहान येथून आलेल्या लोकांची यादी सरकारकडून तयार केली जात आहे. यासाठी इमिग्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधण्यात येणार असून राज्यातील कोरोनाच्या प्रत्येक संशयित रुग्णांकडे लक्ष देण्यात येत आहे.

केरळमध्ये गेल्या आठ दिवसातील कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. आज आढळलेल्या या रुग्णाला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत. चीनमधून काही दिवसांपूर्वी परतलेला एका व्यक्ती कोरोनाने बाधित झाला होता. कोरोना व्हायरसची लागण झालेला हा भारतातील दुसरा रुग्ण होता. या घटनेला काहीच तास उलटत नाही तर आणखी एक रुग्ण आढळला. यामुळे खबरदारीचा पर्याय म्हणून केरळ सरकारने हा आजार राज्य आपत्ती म्हणून घोषित केला आहे.