जगातील बाहुबली नेते, PM नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, ५०० रूपयाच्या नोटेवर लिहीला ‘मेसेज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या गुरुवायूर मंदिरात पुजा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंदिराच्या कार्यालयाला एक लिफाफा पाठविण्यात आला होता. या लिफाफ्यात एका पाचशे रुपयाच्या नोटेवर मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

मल्ल्याळम भाषेत धमकी –

या नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते, मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हि धमकी मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा यामुळे सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एसपीजीला माहिती दिली असून हे पत्र कुणी लिहिले आहे याचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे यावेळी मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी घेत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

या कारणामुळे होतो “ब्रेस्ट कॅन्सर”जाणून घ्या याची लक्षणे

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ” 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like