केरळमधील मुस्लिम युवकांकडून बंधू-भाव, केली हिंदूच्या मंदिराची ‘साफसफाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये सर्वधर्म समभावाचे एक उत्तम आणि आदर्श उदाहरण समोर आले आहे. केरळमधील कन्नूर येथे मुस्लिम युथ लीगच्या कार्यकर्त्यांनी अम्मकोटम महादेव मंदिराची साफसफाई केली. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे. हे महादेव मंदिर देखील या पुराच्या पाण्याखाली गेले होते. जवळपास दोन दिवस हे मंदिर पाण्याखाली होते.

रविवारी या मंदिरातील पाणी उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणात मंदिरात कचरा आणि घाण पसरली होती. पाणी उतरल्यानंतर मुस्लिम युथ लीगच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरातील कचरा आणि घाण हटविण्यास सुरुवात केली. केरळमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठले असून अनेक गावांत अजूनही पुराचे पाणी तसेच आहे. अधिकृत माहितीनुसार ८ ऑगस्ट पासून ते ११ ऑगस्टपर्यंत ७२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून ५८ जण बेपत्ता आहेत तर ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत अडीच लाख लोकांनी १६३९ पुनर्वसन शिबिरांत आश्रय घेतला आहे. हवामान विभागाने कन्नूर, कसरगोड आणि वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली असून बचावकार्य आणि मदत मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात नागरिक विस्थापित झाले आहेत. पुरामुळे आतापर्यंत नऊ राज्यातील २२१ नागरिकांचा मृत्यू झाला असून हवामान विभागाने अजून मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like