Coronavirus : देशातील 5 राज्यात 62 % सक्रीय कोरोना रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक

नवी दिल्ली : नव्या वर्षात कोरोनाची लस (corona vaccine) येणार असून लवकरच देशात लसीकरण (vaccination) सुरु होणार आहे. देशातील कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या देशातील ६२ टक्के सक्रीय रुग्ण हे पाच राज्यात आढळून येत आहेत. त्यात इतके महिने प्रथम क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रापेक्षा सध्या केरळमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण आढळून येत आहेत.

केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या पाच राज्यात ६२ टक्के सक्रीय रुग्ण सध्या आहेत. सध्या देशभरात २ लाख ५४ हजार २५४ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात केरळ – ६५ हजार ३८१, महाराष्ट्र ५४ हजार ४५ सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश १४ हजार २६०, पश्चिम बंगाल ११ हजार ९८५, छत्तीसगड ११ हजार ४३५ इतके सक्रीय रुग्ण आहेत.

देशात शुक्रवारी २० हजार ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. या आजारातून ९८ लाख ८३ हजार रुग्ण बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९६.०८ टक्के इतके आहे.

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे़ देशातील नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे़