धक्कादायक..गरोदर हत्तीणीला खायला दिले फटाक्यांनी भरलेले अननस, नदीतच झाला दुर्देवी मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाण्यास दिले, त्यामुळे या हत्तीणीचा नदीत उभ्या उभ्या मृत्यू झाला. या घटनेमुळे माणुसकीचा अंत झाला की काय असेच दिसून आले आहे.

गरोदर हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिले. गर्भवती असल्याने काहींना तिला फळ दिली. मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळले नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचे वय ते 14-15 वर्ष होत.

हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने शनिवारी तिचा मृत्यू झाला. वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. मादी हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या खेड्यात फिरत होती. हत्तीणी जखमी झाल्यानंतर गावातून पळून गेली पण कोणालाही काही केले नाही. गंभीर जखमी झाली असे असूनही तिने कोणाचे नुकसान केले नाही आणि तिच्यावर हल्ला केला. मानवांवर विश्वास ठेवल्यामुळे तिला ही शिक्षा मिळाली असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like