काय सांगता ! होय, ‘लग्नासाठी वधू पाहिजे’ म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं शहरभर लावले बॅनर्स, केलं संपर्क करण्याचं आवाहन

कोट्टयम : वृत्तसंस्था –    केरळच्या कोट्टयम जिल्ह्यातील बॅनरची सोशल मीडियार जोरदार चर्चा होताना दिसत आहे. वधून पाहिजे यासाठी लावलेला बॅनर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येताना दिसत आहे. एका युवकानं वधू पाहिजे म्हणून बॅनर झळकवले आहेत.

अनीश सेबास्टियन असं या बॅनर लावणाऱ्या युवकाचं नाव आहे. 35 वर्षीय अनीशनं एट्टुमानुरच्या कनक्करी जवळ एक मोठं पोस्टर लावलं आहे. या पोस्टरचा फोटोही त्यानं फेसबुकवर पोस्ट केला आहे. याची कोणतीही मागणी नाही असं त्यानं लिहिलं आहे. यावर त्याचा मोठा फोटो आहे. सोबत मोबाईल नंबर, व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि मेल आयडी दिला आहे. याशिवाय त्यानं मुलीनं किंवा तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी संपर्क करावा असं आवाहन देखील केलं आहे.

पारंपरिक पद्धतीनं मुलगी मिळाली नाह म्हणून लढवली शक्कल

अनीशनं सांगितलं की, लग्न होत नसल्यानं वय निघून जात आहे. पारंपरिक पद्धतीनं मुली पाहून कंटाळा आला, मनासारखी मुलगी पसंत पडत नाही. सर्वांना कल्पना यावी की मी लग्नासाठी मुलगी शोधत आहे म्हणून असं होर्डिंग लावलं आहे. अरेंज मॅरेजमुळं अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. इंटरनेटवरून अनेक लग्न जुळतात परंतु ते यशस्वी ठरतात. म्हणून स्वत:साठी अशा प्रकारे परफेक्ट जोडीदार शोधण्याचा प्रयत्न आहे असंही तो म्हणाला.

‘कोरोना काळात चांगली कल्पना, लोक साधाताहेत संपर्क’

अनीशनं असंही सांगितलं की, कोरोनाच्या काळात लोकांच्या घरी जाणं शक्य नाही. लोक एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लग्न जुळवण्यासाठी हे माध्यम सर्वोत्कृष्ट आहे. होर्डिंग लावल्यापासून बरेच लोक संपर्क साधत आहेत. शहरभरात लावलेल्या या बॅनर्सनं सर्वांच लक्ष वेधलं आहे.