सरकारी शाळेच्या पुस्तकात भलतंच ज्ञान ; म्हणे लग्नाआधी सेक्स केल्याने होतो एड्स

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – एकीकडे एड्स या रोगाविषयी सरकारकडूनच जनजागृती केली जात आहे. मात्र केरळ सरकारच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या पुस्तकात एड्सविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स रोगाची लागण होते असे भलतेच ज्ञान केरळ सरकारच्या शाळेच्या पुस्तकात पाजळण्यात आले आहे. पाठयपुस्तकातील या धड्याविषयीचा फोटो पलक्कडमधील डॉक्टर अरूण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केरळ सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेले हे बायोलॉजीचं पुस्तक २०१५-१६ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे. संबंधित धड्यामध्ये एड्स होण्यामागील चार कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. कारणांमध्ये लग्नाआधी अथवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो, अशी अजबच माहिती छापण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी या चुकीच्या माहितीचा अभ्यास करत आहेत. डॉक्टर अरुण यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. त्यानंतर ही पोस्ट खूप व्हायरल झाली त्यानंतर नेटकऱ्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरण्यास सुरुवात केली. याबाबत चौफेर टीकेची झोड उठवल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संशोधनअधिकारी निशी यांनी सांगितले की, पुस्तकात छापण्यात आलेली चूक आमच्या लक्षात आली असून ती तातडीने दुरूस्त करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रातील पुस्तकांमध्ये हा मुद्दा दिसणार नाही’.पुस्तकात छापण्यात आलेल्या माहितीचा मसूदा आताच्या टीमने तयार केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संतापजनक ! १६ वर्षीय विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार

“हिंमत असेल तर माढ्यातून लढाच”, पवारांचं खुलं आव्हान 

You might also like